महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यातील बस चालकाला डांबरी रस्त्यावर आपटले….संबधित आरोपी फरार

सातारा बस स्टॅण्ड वरून रोज सकाळी ६.३० सुटणारी सातारा- केळवली गाडी फलाटावर लावत असताना आज एका व्यक्तिने चालू गाडीचा दरवाजा उघडून गाडीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. (गाडी क्रमांक ११९७८) चे चालक श्री जाधव यांनी गाडी फलाटावर लागल्यावर गाडीत बसा असे म्हटले याचा राग धरून ७.१५ ते ७.३० दरम्यान कुस या स्टॉप वर गाडी थांबली.  संबंधित व्यक्तीने गाडीतून उतरून पुढील बाजूने येऊन चालकाच्या बाजूकडील दरवाजा उघडला व चालकाला काही कळायच्या आत चालकाला सिटवरून बेसावध असताना उचलून खाली डांबरी रस्त्यावर आपटले. दरम्यान  गाडीतील प्रवासी खाली उतरे पर्यंत संबंधित आरोपी पळून गेला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने  चालक जाधव काही काळ बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना ॲम्बुलन्स ने सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!