महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल होणार रोबोट

    पुण्यातील ससून रुग्णालयात सर्जरी विभागात रोबोट दाखल होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता विविध क्षेत्रात मोठे बदल होताना दिसत आहेत. त्याप्रमाणेच रोबोटिक्स तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियांमध्ये अचूकता आली असून वेळ व खर्चात बचत होत आहे. तंत्रज्ञानामधील अचूकता, वेळेची बचत तसेच कमी वेदना आणि नेमकेपणा यामुळे रोबोटिक्स शास्रक्रियांना महत्व देण्यात येत आहे. यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये रोबोटिक्स शस्त्रक्रियांचे  प्रमाण वाढत आहे.

      ससून हे भारतीय बनावटीचा रोबोट खरेदी करणारे राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे. ससून रुग्णालयात गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये रोबोटिक्स आर्म च्या सहाय्याने पहिली शस्त्रक्रिया प्रायोगिक तत्वावर पार पडली आणि आता ससून हे पुढच्या पावलावर आहे. जगभरात सर्जरी बाबत विविध प्रयोग केले जातात परंतु ते अतिशय महाग असतात. त्यामुळे गरिबांना रोबोटिक्स सर्जरीचा खर्च करणे परवडत नाही. त्यामुळे ससून रुग्णालयात रोबोटिक्स शस्रक्रिया रुग्णांसाठी वरदानच ठरणार आहे.
     देशात व जगभरात रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गॉल ब्लेडर, हर्निया, गायनकलॉजिकल इत्यादी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. ससूनमधील रोबोटिक्स तंत्रज्ञान हे भारतीय बनावटीचे असुन  पुढील एक दोन महिन्यात रुग्णांसाठी रोबोटिक्स शस्त्रक्रिया उपलब्ध होतील. हे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. याचा सर्व रुग्णांना मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!