महत्त्वाच्या बातम्या

वृक्षसंवर्धनाचा संदेश देत चंदन शिंदे यांच्याकडून मोफत वृक्षरोपांचे वाटप

खोजेवाडी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते चंदन शिंदे यांच्या पुढाकारातून खोजेवाडी परिसरात मोफत वृक्षरोप वाटप उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
        कार्यक्रमात नागरिकांना फळझाडे, सावलीची झाडे तसेच विविध औषधी वनस्पतींची रोपे विनामूल्य देण्यात आली. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोपे स्वीकारली. यावेळी चंदन शिंदे यांनी उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पाण्याची टंचाई यांसारख्या समस्यांवर वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले.
       “झाडे लावा, झाडे जगवा” आणि “एक माणूस, एक झाड” ही संकल्पना प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे. भावी पिढीसाठी स्वच्छ हवा, समृद्ध पर्यावरण आणि हिरवाई जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
उपस्थितांनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमामुळे परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!