डोंबिवलीत धक्कादायक घटना- वन्य प्राण्यांना केले कैद
वन्य प्राण्यांना कैद करून ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे परंतु अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे.डोंबिवलीत खोनी रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सरडे, साप, चिंपाची माकड व विविध प्रकारची कासवे यांसारखे प्राणी कैद करून ठेवण्यात आले होते. मुंबई व ठाणे विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
फैजान खान असे आरोपीचे नाव असून सध्या तो फरार आहे. हाय प्रोफाइल सोसायटी मध्ये राहणारे लोक आपल्या घरात तसेच हॉटेलमध्ये असे अनेक प्राणी शो साठी ठेवत असतात परंतु या प्राण्यांची लाखो-करोडो रुपयांत खरेदी विक्री केली जाते. फैजान खान याने पलावा सिटी मध्ये सवरना इमारतीमधील बी विंग मध्ये एक घर भाड्याने घेतले होते व तो त्याचा वापर वन्य प्राण्यांची तस्करी करण्यासाठी करत होता. मुंबई वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती लागतच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रुचून त्याच्या फ्लॅटवर छापा टाकला.
त्याने कैद केलेल्या प्राण्यांमध्ये सोनेरी,पांढऱ्या, हिरव्या रंगाचे मोठे साप, एग्वणा सरडा,चिंपाजी माकड विविध प्रकारची सात ते आठ कासवे पिंजऱ्यात कैद केलेली आढळली. या प्राण्यांची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे. मुंबई व ठाणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
