फिरती पथकाकडून डोंगर भागात येणाऱ्या वाहणांची कसून तपासणी
विधानसभा निवडणुक ऐन रंगात आली असताना शासनाने नेमेलेल्या फिरती पथकाचे काम देखील जोमात चालू आहे. रोख रक्कम, हत्यारे, सोने, दारूची वाहतूक वाहनातून होऊ नये यासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर वाहनांची तपासणी जोरदारपणे चालू आहे. जावळी तालुक्यात अशी फिरती पथके अगदी डोंगरी भागात घाटात देखील तत्परतेने उभी असून संशयास्पद वाहने दिसलीच तर त्याची कसून पणे चौकशी करत आहेत. आनेवाडी, करहर, केळघर, बामणोली विभागातील खोऱ्यात ही पथके तैनात असून कोणत्याही संशयास्पद वाहनाची तपासणी अगदी काटेकोरपने चालू आहे.
मतदानाच्या दिवसा पर्यंत ही तपासणी सुरू राहणार आहे. प्रत्येक फिरती पथकासोबत आर्मीचे जवान देखील असल्याने कोणत्याही वाहणाला त्यांच्या तपासणीला सामोरे जावे लागत आहे. डोंगराळ भागात छोटी छोटी गावे असल्याने त्या ठिकाणी देखील ही पथके अचानक दाखल होत आहेत. बामणोली विभागात पथक प्रमुख अजितकुमार पवार, सब असिस्टंन्ट सचिन बेसके व आर्मीचे जवान शासनाने दिलेला आदेश योग्य पद्धतीने पाळत आहेत.
