महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्यात 11 वाजे पर्यंत 18.72 % लोकांनी बाजवला मतदानाचा अधिकार

     विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात विविध ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली असून शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात देखील मतदाना साठी लोकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर येथे 18.57% तर कराड दक्षिण मध्ये 19.71% लोकांनी  मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. कोरेगाव येथे 21.24% , माण – 15.21% , पाटण-18.93%, फलटण-17.98%, वाई- 18.55% आणि सातारा येथे 19.97 % लोकांनी मतदान केले आहे.

 मतदान केंद्रावर कोणताही गैर प्रकार होऊ नये तसेच मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मतदान प्रक्रियेत लोक सहभागी होत असून मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करत आहेत. मतदान प्रक्रिया संध्याकाळी 6 वाजे पर्यंत सुरु राहणार आहे.राज्यात सर्वत्र मतदान केंद्रांवर कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच इव्हिएम मशीन द्वारे हे मतदान केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!