महत्त्वाच्या बातम्या

26/11 हल्ल्यात शहीद झालेल्यांना सदरबाजार येथील शहिद अशोक कामटे उद्यानात भावपूर्ण श्रद्धांजली….सौ.वेदांतिकाराजे भोसले .

    मुंबईत 26 नोव्हेंबर रोजी दहशदवादी हल्ला झाला होता. ही घटना सर्वांच्या मनात खोल घर करून गेली आहे.या आतंकवादी हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी सौ. वेदांतिकाराजे भोसले  यांच्या उपस्थितीत साताऱ्यातील  सदरबझार येथील शहीद अशोक कामटे उद्यानात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
      यावेळी त्या म्हणाल्या,  या हल्ल्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी व अनेक निरपराध नागरिक मारले गेले. परदेशी नागरिक सुद्धा या हल्ल्यात बळी पडले. यामध्ये मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सातारा जिल्ह्यातील तीन पोलीस कर्मचारी शहीद झाले. तसेच या हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे यांनी काही काळ सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली होती.
       यावेळी बोलताना शंकर माळवदे यांनी सांगितले की, या हल्ल्यात अजमल कसाबला जिवंत पकडण्यात यशस्वी झालेले शहीद तुकाराम ओंबळे हे जावळी खोऱ्यातील होते. त्यांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमामुळे मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध झाले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते वैभव पोतदार यांनी केले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, अरुण भोसले, मा.नगरसेवक निशांत पाटील, शंकर माळवदे, श्रीकांत आंबेकर उपस्थित होते. त्याचबरोबर विकास धुमाळ, चेतन सोळंकी, लतीफभाई चौधरी, गणपतराव मोहिते, संजय जाधव व सुजित जाधव उपस्थित होते.

   या कार्यक्रमास महिलांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यामध्ये गौरी कुलकर्णी, रजनी जेधे, कांचन घाडगे, सौ वैद्य मॅडम, रीना भणगे, गौरी गुरव, सुनिता पोतदार, स्वप्नाली पोतदार, अनिता एकमे व ज्योती लाहोटी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!