महत्त्वाच्या बातम्या

क्रांतिसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तोफखाना परिसरातील लहुजी साळवेंच्या पुतळ्यासमोर नागरिकांकडून अभिवादन.

      क्रांतिसुर्य महात्मा फुले या नावाने लोकप्रिय असणारे ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, समाजसुधारक, विचारवंत, आणि लेखक होते यांच्या स्मृतिदिना निमित्त काल दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सातारा शहरातील लहुजी साळवेंच्या पुतळ्यासमोर फोटोला पुष्प अर्पण करून नागरिकांकडून अभिवादन करण्यात आले.यावेळी तोफखाना येथील नागरिक उपस्थित होते.
      महात्मा फुले यांनी समाजिक प्रबोधन, अस्पृश्यता , जातीव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले. त्यांच्यामुळे आज समाजात अमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. ज्योतिराव फुले यांचे मुळगाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे आहे. याच गावी त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा फुलेंनी स्रियांची स्थिती सुधारण्यासाठी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. मुलींना शिकवण्यासाठी शिक्षक मिळत नसल्याने त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले.  त्यांनी विधवा आणि महिलांच्या कल्याणासाठी खूप प्रयत्न केले. दलित आणि दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी ज्योतिबांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

      त्यांची समाजसेवा पाहून 1888 मध्ये त्यांना मुंबईत एका मोठ्या   मेळाव्यात ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली. ते बालविवाहाच्या विरोधात होते व विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते. त्यांनी शेतकऱ्यांचा असूड, तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी अशी अनेक पुस्तके लिहली. महात्मा फुले आणि त्यांच्या संघटनेच्या संघर्षामुळे सरकारने कृषी कायदा संमत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!