महत्त्वाच्या बातम्या

हडपसर विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतमोजणी

    महाराष्ट्र राज्य विधानसभेचे निकाल लागल्यानंतर केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात EVM बद्दल संशय व्यक्त केला जात आहे. देश विदेशातील जाणकार याबाबत आपले मत मांडत असून EVM मध्ये गैरप्रकार झाल्याची अनेकांची भावना आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याबाबत काही पुरावे ही सादर केले.

       हडपसर मतदार संघात पुन्हा मतमोजणी व्हावी यासाठी त्यांनी अर्ज केला असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १२ लाख ७४ हजार रुपये शुल्कही त्यांनी चलनाच्या माध्यमातून जमा केले आहे. “कोण आमदार होणार, कोणाची सत्ता येणार एवढ्या पुरताच हा प्रश्न मर्यादित नाही. जनतेच्या मतांची झालेली चोरी थांबवणे, लोकशाहीचे सुरू असलेले वस्त्रहरण रोखणे, या प्रकरणात दोषी असलेल्या देशद्रोही लोकांवर कडक कारवाई करणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याची भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. 
     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या  संविधानावर श्रद्धा असलेला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून लोकशाहीच्या रक्षणासाठी हा लढा न्यायालयीन पातळीसह रस्त्यावरही सुरूच असेल. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून या लढ्यातून नक्कीच न्याय मिळेल हा विश्वासही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!