सातारा शहराचे कुलदैवत आईसाहेबांचा शाही सोहळा संपन्न
सातारकरांचे श्रद्धास्थान असलेल्या आईसाहेब यांचा भव्य आगमन सोहळा मंगळवारी पार पडला. ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत सर्व भक्तजन मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
राजवाडा परिसरातील मोती चौक येथे भाविकांनी मोठ्या जल्लोषात आईसाहेब देवीचे स्वागत केले. देवीची भव्यदिव्य मिरवणूक रात्री च्या वेळेस काढण्यात आली होती .सदरबाझार येथील भारतमाता देवीचे आगमन सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी झाले.आईसाहेब आणि भारतमाता देवीची प्रतिस्थापना आणि नवरात्रोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो.
आईसाहेब देवीची स्थापना राजवाडा परिसरातील मोती चौक येथे तर भारतमाता देवीची स्थापना सदरबाझार येथे करण्यात येते .
