महत्त्वाच्या बातम्या

रामलीला मध्ये दिसणार मिस युनिव्हर्स इंडिया रिया सिंघा 

 

        नवी दिल्ली: रामजन्मभुमी असणाऱ्या अयोध्या येथे रामलीलाची तयारी सुरु झाली आहे. मिस युनिव्हर्स 2024 ची विजेती रिया सिंघा ही अयोध्येच्या रामलीलेचा भाग होणार आहे. रामलीला मध्ये माता सीतेच्या भूमिकेत त्या दिसणार आहे. या वर्षी होणाऱ्या रामलीला मध्ये 42 अभिनेते सामील होणार आहेत. ज्यामध्ये बाली आणि सुग्रीव च्या भूमिकेत सुप्रसिद्ध कलाकार मनोज तिवारी आणि रवी किशन दिसतील .

        रिया सिंघाला प्रभू श्री रामांच्या जन्मभूमीवर रामलीला मध्ये काम करण्याची संधी मिळाली यासाठी तिने आयोजन समितीला आभार मानले आहे. रामलीला मध्ये माता सीतेच्या भूमिकेस घेऊन रिया सिंघाला उत्सुकता आहे. ती म्हणाली हे वर्ष माझ्यासाठी खूपच खास आहे. भगवान श्री रामांच्या आशिर्वादाने जगातील सर्वात मोठी रामलीला आयोध्येची रामलीला मध्ये मला माता सीतेची भूमिका करण्याची संधी मिळाली.

       रिया सिंघाने 22 सप्टेंबर ला जयपूर येथे मिस युनिव्हर्स इंडिया चा किताब पटकावला. यावर्षीच्या रामलीलेमध्ये सर्व मोठे कलाकार सहभागी होणार आहेत. दिग्गज अभिनेत्री भाग्यश्री माता वेदवती ची भूमिका निभावणार आहेत.तर लोक गायिका मालिनी अवस्थी माता शबरी च्या भूमिकेत दिसतील.

         रामलीलाचे फाउंडर प्रेसिडेंट अध्यक्ष सुभाष मलिक (बॉबी) यांनी सांगितले की यावर्षी रामलीला मागील वर्षीचे सगळे रेकॉर्ड्स मोडतील. रामलीला 3 ऑक्टोबर 2024 पासून 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत अयोध्या मध्ये संपन्न होणार आहे. गतवर्षी 36 करोड लोक रामलीला पाहण्यास आले होते परंतु यावर्षी 50 करोड पेक्षाही जास्त लोक यामध्ये सामील होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!