वडिलांसोबतच्या वादातून अल्पवयीन मुलगा घरातून बेपत्ता
वडील आणि मुलाचे वाद हे काही नवीन नाहीत. अनेक घरांमध्ये वडील आणि मुलगा यांच्यात वाद होतच असतात परंतु अशाच वादातून मुलगा रागाच्या भरात घर सोडून निघून गेल्याची घटना सातारा येथे घडली आहे. बुधवार दि.11 डिसेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास सातारा जिल्ह्यातील काशीळ येथून अल्पवयीन मुलगा घर सोडून गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत निसार नूर मोहम्मद मुजावर यांनी बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलगा वडीलांसोबत झालेल्या वादातून घर सोडून गेला आहे. वडिलांनी मुलाला रात्री उशिरा घरी येण्या मागचे कारण विचारले असता त्यांच्या मध्ये वाद झाला.या कारणामुळे मुलगा घर सोडून गेला असून त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली परंतु काहीच खबर न मिळाल्याने निसार नूर मोहम्मद मुजावर यांनी बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये मुलगा बेपत्ता असल्याची केस दाखल केली आहे.
या सांदर्भातील अधिक तपास बोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजाराम निकम करत आहेत.
