महत्त्वाच्या बातम्या

कोंढवा परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग; जवानांनी वाचवला चिमूल्याचा जीव

    पुण्यातील कोंढावा येथे भीषण आग लागल्याची बाब समोर आली. मंगळवारी दुपारी २•३९ च्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दल नियंत्रण कक्षात कोंढवा खुर्द, भाग्योदय नगर, गल्ली क्रमांक ३४ येथे दुकानामध्ये आग लागली होती. घटनेची वर्दि मिळताच तातडीने कोंढवा खुर्द व बुद्रुक येथून दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली.

      घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, जुन्या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर असणाऱ्या   कपड्याच्या दोन दुकानामध्ये  आग लागली होती. अग्निशमन दलाने  पाण्याचा मारा सुरु केला. व
आग वरील मजल्यावर व इतरञ पसरणार नाही याची दक्षता घेत वरील मजल्यावर रहिवाशी असलेल्या पाच महिला व एक लहान मुलगा (वय वर्ष ३) यांना श्वसन यंञ (बी ए सेट) परिधान करीत आग व धुरामधून बाहेर काढले.  पुढे सुमारे वीस मिनिटात आग पुर्ण विझवत पुढील धोका दूर केला. आगीमध्ये कपडे, लाकडी सामान, विद्युत उपकरणे, यंञसामग्री इत्यादी जळाले असून मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आगीमध्ये एका महिलेच्या पायाला व दलाचे जवान यांच्या हाताला किरकोळ स्वरूपात भाजले आहे. 

     सदर घटनास्थळी लहान मुलाचा वाढदिवस असताना त्याची दलाच्या जवानांनी केलेली सुखरुप सुटका याबद्दल स्थानिकांनी जवानांचे आभार मानत कौतुक केले. यावेळी वाहनचालक रविंद्र हिवरकर, सत्यम चौंखडे व जवान रफिक शेख, किशोर मोहिते, योगेश पिसाळ, सागर दळवी, निलेश वानखेडे, कुणाल खोडे, गोविंद गीते,हर्षल येवले, हर्षवर्धन खाडे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!