जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य प्रवेशद्वारावर पारध्यांचा संसार
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारवर अनेक दिवसापासून पारध्यांनी संसार थाटला आहें. पारध्यांनी संपूर्ण भिंतीवर कपडे पांघरुणे टाकली असून लहान मुले रस्त्यावर अंघोळी करतात. अनेकवेळा आपआपसात भांडणे ही यमदजे पाहायला मिळतात. हे मुख्य रस्त्यावर असल्याकरणाने वहानांची वर्दळ देखील असते.
जिल्हाधिकारी मुख्य प्रवेशद्वारा जवळ अनेक आंदोलने मोर्चे सुरू असतात पण पारध्यांनी जागा बळकावल्यांमुळे आंदोलनकर्तांना मुख्य रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते यामुळे वाहतूक कोंडी ची शक्यता निर्माण होते. सदर परिसरास ओंगळवाणे स्वरूप आले आहे. प्रशासन ठिम्म असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या भिंतीलगतच पोलीस चौकी आहे पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी यात लक्ष घालून परीसर स्वच्छ करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
एक उपमुख्यमंत्री व चार कॅबीनेट मंत्री बिरुदावली मिरवणाऱ्या सातारा जिल्हातील प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे अंत्यत गरजेचे आहे.
