महत्त्वाच्या बातम्या

नागठाणे महाविद्यालयात भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न

     श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज , नागठाणे या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नागठाणे परिसरातील सर्व ज्युनिअर कॉलेज मुले व मुली यांच्या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन नवीन वर्षाच्या प्रारंभी करण्यात आले. कबड्डी स्पर्धेत नागठाणे परिसरातील सर्व ज्यु. कॉलेजच्या मुले व मुलींचे संघ सहभागी झाले. 
  
    या भव्य कबड्डी स्पर्धेचे उदघाटन मा यशवंत हरी साळुंखे (नाना) चेअरमन, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना शाहूनगर शेंद्रे जिल्हा सातारा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड हे होते. यशवंत साळुंखे यांनी कबड्डी स्पर्धांच्या आयोजनाबाबत महाविद्यालयाचे कौतुक केले आणि या उपक्रमामुळे वेगळ्या प्रकारे नवीन वर्षाचे स्वागत केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जिमखाना विभागप्रमुख डॉ.लक्ष्मण दोडमणी यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. राजाराम कांबळे यांनी केले. तर आभार डॉ. अजितकुमार जाधव यांनी मानले. त्यावेळी कॅप्टन दिलीप मोहिते, नलवडे साहेब सुभेदार , श्री.आबाजी साळुंखे,  श्री.बिपिन साळुंखे श्री. संदीप साळुंखे, प्राचार्य अशोक देसाई, श्री नलावडे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

    कबड्डी स्पर्धेमध्ये  श्री रामकृष्ण विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज नागठाणे या कॉलेजच्या मुले व मुलींच्या  दोन्ही संघाने स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तसेच छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अपशिंगे ज्युनिअर कॉलेजच्या मुले व मुलींच्या दोन्ही संघाने द्वितीय क्रमांक मिळवला व  श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तारळे या कॉलेजच्या मुले व मुलींच्या दोन्ही  संघाने तृतीय (उत्तेजनार्थ)  क्रमांक मिळविला.

     भव्य कबड्डी स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळालेल्या मुले व मुली या दोन्ही संघाना प्रत्येकी ३००० रोख रुपये, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक मिळालेल्या मुले व मुली या दोन्ही संघांना प्रत्येकी २००० रुपये रोख चषक व प्रमाणपत्र तसेच तृतीय क्रमांक मिळालेल्या मुले व मुली या दोन्ही संघांना प्रत्येकी १००० रुपये रोख चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.  पंच म्हणून श्री बळीराम साळुंखे व विश्वास साळुंखे  या राष्ट्रीय पंचांनी काम पाहिले.

    सहभागी संघांना चषक, रोख रक्कम व पारितोषिक देण्यासाठी श्री सुरेश ताटे, श्री प्रदीप साळुंखे, श्री शशिकांत पाटील डॉ. विकास जाधव डॉ. शहाजी जाधव यांनी मोलाचे आर्थिक सहकार्य केले.  संघ नोंदणी प्रा शैला चोबे व प्रा रघुनाथ सपकाळ, गुणलेखक म्हणून डॉ गणेश गभाले , वेळाधिकारी म्हणून डॉ संदीप लोखंडे व समालोचन प्रा. संतोष निलाखे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व संघ व्यवस्थापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!