चेंबूरच्या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू
मुंबई – सिद्धार्थ कॉलनी (चेंबूर) येथे आज आगीची भीषण घटना घडली. यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अजून अस्पष्ट असून इतर जखमी व्यक्तींना घाटकोपर येथील एका रुग्णालयात दाखल केले आहे.
रविवारी पहाटे चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आग लागली. आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 7 वर्षे व 10 वर्षाच्या मुलांचाही समावेश आहे. पहाटे साडे चार च्या सुमारास ही घटना घडली. आग लागली तेव्हा सर्वजण झोपेत होते आगीच्या भडक्यामुळे कोणालाच बाहेर पडता आले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्यास सुरुवात केली परंतु अगीचा भडका वाढला होता.
जखमींना घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयत दाखल केले आहे. अनिता गुप्ता (वय – ३०), नरेंद्र गुप्ता (वय-१०), परिस गुप्ता (वय- ७), मंजू प्रेम गुप्ता (वय३०), प्रेम गुप्ता (वय ३०) अशी या घटनेतील मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
