महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा  डेरवण येथे बाल बाजार उपक्रमाचे आयोजन

    जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा डेरवण ता. पाटण येथे बालबाजार  उपक्रम पार पडला. सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान अवगत व्हावे त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील व्यवहारिक अनुभव यावे यासाठी या उपक्रमाचे दि.13 जानेवारी रोजी आयोजन केले होते. यासाठी ग्रामपंचायत डेरवण  मा.सरपंच सौ मंगल बाखले  ,उपसरपंच श्री निलेश सोनावले व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक प्रकाश रावते, ग्रामपंचायत ऑपरेटर शरद मराठे ,सर्व पालक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय यादव, उपाध्यक्ष विकास माने व  सदस्य दादासो काळूलकर, निलेश सोनावले, सारिका जाधव, आशालता यादव, नीलम लोहार, संपतराव यादव उपस्थित होते.

 तसेच सखी सावित्री समिती सदस्य वर्षा यादव, निर्मला यादव उपस्थित होत्या. तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा महिपाल, अंगणवाडी  सेविका वनिता यादव व उषा जाधव उपस्थित होते व चाफळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामराव वेताळ साहेब व शेडगे साहेब यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षा विषयक माहिती दिली तसेच गुड टच अँड बॅड  टच याविषयी मार्गदर्शन केले. शाळेचे उपशिक्षक श्री हणमंत नागरगोजे सर व श्री दत्तात्रय चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांच्या बालबाजाराचे नियोजन केले तसेच मुख्याध्यापक श्री रामहरी वणवे सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!