महत्त्वाच्या बातम्या

मकरसंक्राती निमित्त हजारो महिलांनी घेतला वाणवसा सीतामाईच्या डोंगरावर महिलांची आलोट गर्दी.

 
  माण तालुक्यातील कुळकजाई येथील सीतामाईच्या डोंगरावर मकर संक्राती निमित्त वसा देण्यासाठी व सुवासिनीचा वाण लुटण्यासाठी महिलांनी आज दिवसभर गर्दी केली. सितामाईच्या दर्शनासाठी व वसा देण्यासाठी आज सकाळपासूनच महिलांनी रांगा लावल्या होत्त्या. पोलीस बंदोबस्तात दर्शन बारी सुरळीत ठेवण्यात आली.

     मकरसंक्रातीच्या निमित्ताने कुळकजाई येथील हजारो महिलांनी सितामाईच्या मंदिरात येऊन वाण घेतला. माण तालुक्यातील पविञ स्थान म्हणून सितामाईचा डोंगर प्रसिध्द आहे. आख्यायिकेत सांगितले आहे की प्रभू रामचंद्राने सितामाईला कुळकजाई येथील बनात सोडले होते. सितामाई निद्रावस्थेत असताना प्रभूरामचंद्रानी त्यांना पिण्याचे पाणी दोन द्रोणामध्ये भरुन ठेवले होते, सितामाई जाग्या झाल्यानंतर त्यांच्याकडून हे द्रोण सांडले व त्यातून दोन नद्याचा उगम पावला. त्यातील एक फलटण तालुक्यातून वहाणारी बाणगंगा व दुसरी माणमधून वहाणारी माणगंगा अशी अख्यायिता सांगितली जाते. याच ठिकाणी लवकुश याचे जन्मस्थानही मानले जाते म्हणून या पवित्र धार्मिक स्थळाला विशेष महत्व आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!