महत्त्वाच्या बातम्या

स्पर्धकांना गुलिगत धोका देत सुरज चव्हाण ठरला “बिग बॉस मराठी सीझन ५” चा विजेता

 

गेली सत्तर हून अधिक दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ चा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आणि या सोहळ्यात रीलस्टार सुरज चव्हाण याने ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

 

बारामतीचा सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका रीलस्टारने ‘बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली आहे, त्यामुळे सुरजच्या चाहत्यांचा आनंद अनावर झाला आहे. त्याच्यावर प्रेक्षक शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

 

गुलिगत धोका फेम सुरज हा बारामतीच्या एका छोट्याश्या गावातला मुलगा आहे. रील बनवून टिकटॉकवर सूरजला प्रसिद्धी मिळाली. अत्यंत गरीब परिस्थितीतून वर येत सूरजने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. पैसे कमावण्यासाठी सुरजने वेळप्रसंगी माथाडी कामगाराचं कामही केलं. त्याचा इथवरच प्रवास मुळीच सोपा नव्हता. शिकलेला नसल्याने त्याला बिग बॉसच्या घरात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

त्यामुळे सुरजने या कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. बिग बॉस मराठीच्या टीमने त्याची त्याच्या गावी जाऊन समजूत काढली होती. त्याच्या साधेपणाने त्याने सगळ्यांची मनं जिंकली. आपल्या वागण्यामुळे, प्रत्येकाचा आदर करण्याच्या सवयीमुळे, टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सूरजला सगळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत सूरज आता बारामतीचा किंग ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!