महत्त्वाच्या बातम्या

कॉफी चहाच्या कागदी कपावर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

    कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत ठरत असलेल्या कॉफी, चहाच्या कागदी कपांवर कायमस्वरूपी बंदीचे आदेश निर्गमित करण्यात यावे अशी मागणी महालक्ष्मी आधार फॉउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ. प्रतिभा ताई शेलार यांनी केली.  देशासह राज्यात कॅन्सर सारख्या आजाराचे रुग्ण अति प्रमाणात वाढत आहेत. सातारा जिल्ह्यात कॉफी- चहाच्या कागदी कपांचा वापर खाद्यपदार्थ विकणारे दुकानदारवर्ग अधिक प्रमाणात करत असल्याचे निदर्शनात येत आहे. असे  कागदी कप बनवताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग केला जातो. कागदी कपात गरम चहा किंवा कॉफी ओतल्यास कपाच्या आतील सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण वितळते आणि प्लास्टिकचे कण चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या पोटात जातात त्यामुळे कॅन्सर सारखा अति गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रशासनाने कागदी कपांवर कायमची बंदी आणावी व असे आदेश लागू करावे, असे निवेदन सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!