महत्त्वाच्या बातम्या

शेतात रक्षा विसर्जन व त्यावर वृक्षारोपण करून वडिलांना दिली अनोखी श्रद्धांजली

      जन्म  व मृत्यू यामध्ये एका श्वासाचे अंतर असते,या कालावधीत आपण केलेले कार्यच आपल्या कामाची पोचपावती ठरते, रक्षाविसर्जन न करता मृत्यूनंतरही आपल्या माणसाची चिरंतन आठवण रहावी,यासाठी रक्षा आपल्या शेतात विसर्जन करून वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश देत गायकवाड कुटुंबियांनी आपल्या वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.
    बेलावडे ता.जावळी येथील ग्रामपंचायत अधिकारी शरद गायकवाड व  त्यांचे बंधू संताजी गायकवाड, शिरीष गायकवाड यांचे वडील शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव गायकवाड यांचे अल्प आजाराने निधन झाल्यामुळे या  कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आप्पा नावाने परिचित असणारे  बापूराव गायकवाड हे जावळी तालुक्यात शिक्षकांमधील एक अत्यंत लाडके व्यक्तिमत्व होते. त्यांचा आदरयुक्त दरारा तालुक्यात होता. त्यांच्या पश्चात  त्यांच्या आठवणी कायम  स्मरणात राहव्यात या हेतूने त्यांचे कुटुंबीय तसेच गावच्या ग्रामस्थांनी व महत्वाचे म्हणजे त्यांचा नातू अभिनव गायकवाड यांच्या संकल्पनेतून अंत्यविधिनंतर रक्षाविसर्जन न करता गावातील सार्वजनिक ठिकाणी तसेच ज्या शेतात आप्पा खऱ्या अर्थाने राबले त्या स्वतःच्या शेतात आंबा, नारळ, चिक्कू, आशा प्रकारच्या फळझाडाचे वृक्षारोपण करून याठिकाणी त्यांची रक्षा विसर्जित करण्याची संकल्पना मांडली व लगेचच गावातील सर्वांनी आप्पांच्या  आठवणी चिरंतन स्मरणात राहव्यात या हेतूने वृक्षारोपण केले व तेथेच त्यांची रक्षा विसर्जित केली. यावेळी त्यांचे नातेवाईक व उपस्थित असणारे मित्रपरिवार या कुटुंबियांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
   याप्रसंगी सतीश बुध्दे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती सातारा, साहेबराव पवार, सौरभ बाबा शिंदे, जयदीप शिंदे ,अंकुशराव शिवणकर ,मच्छिन्द्र मुळीक, हरिश्चंद्र खराडे, हरिश्चंद्र गायकवाड, अभिजित चव्हाण, संदीप सावंत यांच्यासह अनेक मान्यवर श्रद्धांजलीसाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!