महत्त्वाच्या बातम्या

गणेश जयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल: पर्यायी मार्ग जाहीर

    श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाचे मार्ग बंद करून पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.

 मुख्य बदल:

✅ छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पूर्णतः वाहतुकीस बंद
✅ शिवाजीनगर – स्वारगेट मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना बदललेल्या मार्गांचा वापर करावा लागणार
✅ भाविकांना सुरळीत दर्शनासाठी विशेष नियोजन

 पर्यायी मार्ग:
बंद रस्त्यांमुळे अल्टरनेट मार्ग निश्चित केले असून, वाहनचालकांना त्याचा वापर करण्याचे आवाहन.

PMT आणि खासगी वाहनांसाठी ठराविक रस्त्यांवर मार्गदर्शन व्यवस्था ठेवण्यात येणार.

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करून नवीन मार्गांचा वापर करावा व गर्दी टाळावी, असे प्रशासनाचे आवाहन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!