महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार – नीलम गोऱ्हे

   महिलांना न्याय मिळावा आणि लिंग समानता यावी, यासाठी देशात समान नागरी कायदा आवश्यक आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. महाराष्ट्रात हा कायदा लवकरच लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, विरोधक नाराजी व्यक्त करत आहेत.

     स्वातंत्र्यानंतरच या कायद्याचा विचार सुरू झाला होता, असे सरकारचे म्हणणे आहे. यासोबतच, न्यायालयातील निकालपत्रे मराठीत द्यावीत, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली. महिलांना खरा न्याय मिळण्यासाठी कायदा महत्त्वाचा आहे, असेही त्या म्हणाल्या.

 समान नागरी कायदा म्हणजे काय?

समान नागरी कायदा (Uniform Civil Code – UCC) म्हणजे सर्व नागरिकांसाठी समान कायदा. भारतात सध्या वेगवेगळ्या धर्मांनुसार वेगवेगळे वैयक्तिक कायदे आहेत, जसे की विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक प्रक्रिया इत्यादीसाठी हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी यांचे स्वतंत्र कायदे आहेत. समान नागरी कायद्यानुसार हे सगळे कायदे एकसारखे केले जातील, म्हणजे सर्व भारतीयांना समान नियम लागू होतील, कोणत्याही धर्मानुसार वेगळे नियम राहणार नाहीत.समान नागरी कायदा लागू झाल्यास कोणत्याही धर्म, जात, लिंग किंवा प्रांतालाही भेदभाव न करता सर्वांना समान नागरी हक्क मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!