महत्त्वाच्या बातम्या

प्रशासनाने घेतली लोकप्रांतची दखल

    
    सातारा शहरातील जिल्हा परिषद परिसरात ड्रेनेजवरील लोखंडी चेंबर धोकादायक अवस्थेत होते त्यामुळे अपघाताची परिस्थिती निर्माण झाली होती.   दिनांक 27 नोव्हेंबर रोजी लोकप्रांतने प्रसिद्ध केलेल्या सातारा जिल्हा परिषद चौकातील ड्रेनजवरील लोखंडी चेंबर धोकादायक अवस्थेत या बातमीची तत्परतेने दखल घेत सातारा नगर परिषदेने अत्यंत मजबूत अशी लोखंडी जाळी  ड्रेनेजवर टाकल्यामुळे संभाव्य धोके टळले आहेत.
        जिल्हा परिषद चौक हा सातारा शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता समजला जातो. या चौका नजीक सातारा जिल्हा परिषद ऑफिस जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यालय सैनिक स्कूल अनेक खाजगी हॉस्पिटल तसेच अनेक शैक्षणिक संकुले  असल्याने सदर रस्त्यावरून स्कूल बसेस ॲम्बुलन्स व दुचाकींची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. सदर ड्रेनेज वरील लोखंडी जाळीचा भाग खचल्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. नगरपरिषदेने तात्पुरता खबरदारीचा उपाय म्हणून सदर चेंबर समोर  बॅरिकेट उभे केले होते. सदर बॅरीकेटमुळे वहानांची कोंडी तसेच अपघात घडत होते. सदर बॅरीगेट चार महिन्यापासून त्या जागी असल्याने नगरपरिषदेने पुढील कोणतीच कारवाई केली नाही. परंतु बातमी करताच नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले व सदर काम पूर्णत्वास गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!