महत्त्वाच्या बातम्या

ऑटो रिक्षाच्या दरात वाढ

      महाराष्ट्र शासनाने 1 फेब्रुवारी पासून ऑटोरिक्षा दरवाढ लागु केल्याने रिक्षा मिटरचे रिक्लेबेशन करून घेणे आवश्यक असल्याने शासनाने ठरवुन दिलेल्या दरात मिटर रिक्लेबेशन सुरू करावे तसेच रिक्षा चालकांची अडवणूक करुन जादा रक्कम घेणाऱ्या व्यावसायिकांचे लायसन्स रद्द करावे याबाबतचे निवेदन मा.सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. श्री.गावंडे साहेब यांना देण्यात आले. सदर प्रसंगी नवी मुंबई रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष श्री. भरतजी नाईक साहेब, संस्थापक श्री. मारुती कोंडे , सरचिटणीस श्री. विजय पाटील, खजिनदार श्री. दिलीप आमले आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते मा.परिवहन आयुक्त या बाबत लवकरच मिटींग घेऊन निर्णय घेतील व पुढील हप्त्यात रिक्लेबेशन सुरू करु तसेच नियमानुसार शासनाने ठरविलेल्या दरात मिटर दुरुस्ती न केल्यास सबंधीतावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अधिकार्यांनी दिले.
      रिक्षा चालकांनी रिक्लेबेशनचा ठरविलेल्या दरातच काम करुन घ्यावे कुणीही जास्त रकमेची मागणी केल्यास आरटीओ अधिकारी किंवा रिक्षा संघटना पदाधिकार्यांकडे तक्रार करावी असे आवाहन नवी मुंबई रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!