नासाने दिला धोक्याचा ईशारा: पृथ्वीच्या दिशेने येत आहेत 3 संकटे –
अवकाशातून पृथ्वीच्या दिशेने वेगाने एक-दोन नाही तर तीन तीन संकटे येत आहेत. भूकंप, त्सुनामी, महापूर अशी संकटे तर पृथ्वीवर येतच असतात परंतु अवकाशातून पृथ्वीवर संकट कोसळणार आहे.असा नासाने अलर्ट दिला आहे. (CNEOS) नासाचे सेंटर फॉर निअर अर्थ ऑब्जेक्ट स्टडिज हे अवकाशातील हालचालींवर लक्ष ठेऊन असतात आणि त्या हालचालींचा पृथ्वीवर काय परिणाम होईल याची माहिती देतात.
नासाने दिलेल्या माहितीनुसार आज 3 लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहेत. अलर्ट नुसार 2024 TK5 , 2024 TN5, 2018 QE नावाचे लघुग्रह अवकाशात फिरत आहेत. आणि आज 9 ऑक्टोबर रोजी रात्री ते पृथ्वीच्या अगदी जवळ असणार आहेत. त्यांचा आकार अनुक्रमे 31 फुट,24 फुट, 32 फुट आहे. हे तिन्ही लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नगण्य असली तरी आवकाशात सौर वादळे निर्माण होतील.असे खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 2024 TK5 पृथ्वीपासून 227000 किमी दूर आहे. ताशी 32778 किमी वेगाने तो पृथ्वीजवळ घिरट्या घालत आहे. 2024 TN5 हा पृथ्वीपासून 1.94 दशलक्ष किमी अंतरावर असून ताशी 26059 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. 2018 QE पृथ्वीपासून 668000 किमी अंतरावर असून ताशी 15853 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.
जर ते त्यांच्या दिशेपासून विचलित होऊन पृथ्वीला धडकले तर पृथ्वीचा नाश होऊ शकतो. यामुळे सागरी वादळ आणि भूकंपाचा धोका आहे.दळणवळण सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे आणि अनेक देशांमध्ये ब्लॅक आउट होण्याचा धोका आहे असे नासाने सांगितले आहे.
