महत्त्वाच्या बातम्या

पाटण शुगर केन या नुतन साखर कारखान्याच्या चाचणी गळीत हंगामाच्या टेस्टींग व कमिशनींग प्रक्रियेस प्रारंभ

   सातारा जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते सुरु झालेली ही टेस्टींग व कमिशनींग प्रक्रिया येत्या काही दिवसांत पुर्ण होईल. आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात चाचणी गळीत हंगामास सुरुवात होईल. प्रत्यक्षात गळीत हंगाम सुरु होताना पाटण शुगर केनचे सर्व सभासद, शेतकरी, कर्मचारी आणि सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पाटण शुगर केन हा साखर कारखाना फक्त शेतकरी हितासाठी उभारण्यात आला आहे. त्यामुळेच या कारखान्याच्या चाचणी गळीत हंगामातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील अग्रगण्य साखर कारखान्यांच्याप्रमाणेच  ३००० रुपयांची  उचल देण्यात येणार आहे. भविष्यात यापेक्षाही चांगला दर देण्याचा पाटण शुगर केनचा मानस आहे. यावेळी पाटण शुगर केनच्या कमिशनींग व टेस्टींग प्रकीयेची पाहणी केली व सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
       यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन ॲड.अविनाश जानुगडे, विक्रमसिंह पाटणकर, सह.दुध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, पाटण अर्बन बँकेचे संचालक दिनकरराव घाडगे,पाटण अर्बन बँकेचे संचालक दिलीपराव मोटे, जयवंतराव गव्हाणे , पाटण पंचायत समितीचे माजी सदस्य पी.एल.माने, विश्वासराव देशमुख, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नाना मोरे, माजी अर्बन बँक संचालक पोपटराव खेडेकर, शिवाजीराव शिंदे, शंकर शेडगे, गुरुदेव शेडगे, अविनाश पाटील, दिपकसिंह पाटणकर, धैर्यशील पाटणकर, रमेश लुगडे, नानासो बागल, विकास पवार, पितांबर खिल्लारे, अर्जुन गायकवाड, कृष्णाजी चाटे, पाटणकर गटाचे प्रमुख पदाधिकारी, पाटण शुगर केनचे प्रमुख अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!