युवक राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत शिराळा एस. टी. आगारात आंदोलन
एस. टी. आगाराचा गलथान कारभाराचा प्रमुख्याने विद्यार्थ्यांना बसणारा फटका, प्रवाशांची होणारी गैरसोय व झालेली 15 टक्के भाडेवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक व यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. राष्ट्रवादी तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, इतर मान्यवर, पदाधिकारी, शालेय विद्यार्थी व प्रवासी आंदोलनात सहभागी झाले. सकाळी दहा वाजता प्रवेशद्वरापासून एस. टी. प्रशासन व सकार विरोधात घोषणा देत आगारात आले. तेथे फलाटावर आंदोलनकर्त्यांनी ठिया मांडला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, विश्वास पाटील, एन. डी. पाटील, रघुनाथ शेळके, सचिन मुळीक आदींची भाषणे झाली. विद्यार्थी, प्रवाशांच्या अडचणी व विविध मागण्या मागत शिराळा आगारातून सुरू असलेल्या गलथान कारभारावर जिल्हाध्यक्ष विराज नाईक व यशवंतचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी त्यांच्या भाषणातून टीका केली. तसेच पूर्व प्रमाणे तालुक्यातील मांगले, सागाव, कोकरूड येथे पास देण्याची सुविधा पुरवावी. शक्य अल्यास प्रत्येक शाळेत पास देण्याची सुविधा द्यावी. विद्यार्थी संख्येनुसार ज्या त्या मार्गावर ने आण करण्यासाठी बसची व्यवस्था करावी, पूर्व कल्पना न देता कोणत्याही मार्गावरील बस फेऱ्या रद्द करू नये, बस नसल्यामुळे विद्यार्थी शाळेपासून व शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
नवीन बस मागणीसाठी पाठपुरावा करावा आदी मुद्दे भाषणातून मांडले. एस. टी. चे जिल्ह्याचे वरिष्ठ येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका घेतली. आंदोलनस्थळी येऊन आगारप्रमुख धन्वंतरी ताटे यांनी त्यांनी कोणकोणत्या गोष्टींचा पाठपुरावा वरिष्ठांपर्यंत केला, बस फेऱ्यांत कोणत्या सुधारणा केल्या, 20 मिडी बसची केलेली मागणी आदींबाबत माहिती दिली. येत्या आठ दिवसात बस फेऱ्यांत सुधारण करत असल्याचे सांगितल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी विश्वास कारखाना विश्वास कदम, सुरेश पाटील, संदीप तडाखे व दत्तात्रय पाटील, वारणेचे संचालक विजय पाटील, देवेंद्र पाटील, गजानन सोनटक्के, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, शिराळा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील कवठेकर, युवक शहर अध्यक्ष अमित गायकवाड, डॉ. दिनकर झाडे, अजय जाधव, बाजीराव पाटील, डॉ. इंद्रजित यमगर यांच्यासह युवक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, मान्यवर, युवक तसेच पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, साहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल अतिग्रे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त होता. आज झालेल्या आदोलनास प्रहार संघटनेने पाठींबा जाहिर केला होता. पाठींब्याचे पत्र तालुकाध्यक्ष बंटी नांगरे यांनी जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांना आंदोलनस्थळी दिले.
