सिक्कीमचे माजी राज्यपाल, माजी खासदार, आदरणीय श्रीनिवास पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचे 11 फेब्रुवारी रोजी आयोजन
कराड सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल, माजी खासदार, आदरणीय श्री.श्रीनिवास पाटील यांचा मंगळवार दि.11 फेब्रुवारी २०२५ रोजी ८४ वा वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त ते शुभेच्छा स्विकारण्यासाठी गोटे, कराड येथील लोकसेवा कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उपस्थित राहणार आहेत.
आदरणीय श्री.श्रीनिवास पाटील यांचा वाढदिवस कराड येथे साधेपणाने होणार आहे. आदरणीय साहेब हे मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गोटे, कराड येथील त्यांच्या लोकसेवा जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहून हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारणार आहेत. दुपारी २ वाजल्यानंतर ते नियोजित कार्यक्रमासाठी परगावी जाणार आहेत. दरम्यान शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे, पुष्पगुच्छ न आणता विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी साहित्य आणावे अथवा समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. दरम्यान त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
