महत्त्वाच्या बातम्या

तारळे विभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

    पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या तारळे विभागातील विविध विकासकामांचे आज मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई  यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न झाले. यात मौजे नुने, काटेवाडी तारळे, कडवे बुद्रुक, जगदाळवाडी कडवे बु, कडवे खुर्द, केळेवाडी कडेव खुर्द, डोणी, मालोशी, डिगेवाडी मुरुड, संभाजीनगर वेखंडवाडी, संभाजीनगरी  वेखंडवाडी ते खबालवाडी, तारळे आाणि डफळवाडी निवडे येथील विविध विकासकामांसाठी मा. ना. शंभूराज देसाईंच्या पुढाकाराने तब्बल ०४ कोटी २० लक्ष २९ हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.याप्रसंगी तारळे विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!