महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या  

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर परिसरात ही घटना घडली. तीन ते चार तरुणांकडून गोळीबार केला यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

त्यांना लीलावती रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते पण उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.  शनिवारी रात्री ९ वाजता तीन ते चार तरुणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आहे. पण अद्याप हे तरुण कोण होते हे कळू शकलेलं नाही. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी सीसीटीव्ही तपासण्याचं काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!