महत्त्वाच्या बातम्या

अनधिकृत बॅनरवर दहिवडी नगरपंचायतची धडक कारवाई 

 दहिवडी (ता. माण ) येथे अनेक दिवसांपासून अनधिकृतरित्या बॅनर लावले जात होते. अखेर दहिवडी नगरपंचायतने ठोस पावले उचलत यावर कडक कारवाई केली आहे.दहिवडी शहरामध्ये रस्त्याकडे झाडांवर, लाईटच्या खाबांवर जाहिरातीचे बॅनर लावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे नगराध्यक्षा सौ. निलम जाधव ,आरोग्य- सभापती महेश जाधव व मुख्याधिकारी श्री. संदिप घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून त्या मार्फत सोमवार दि.०७ जुलै २०२५ रोजी शहरात सार्वजनिक ठिकाणी इमारतींच्या भिंतीवर कुंपणावर, खांबावर, झाडांवर इतर ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काढण्यात आले.यावेळी आरोग्य सभापती महेश जाधव यांनी कारवाई संदर्भात सांगितले की,शहरांचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा, १९९५’ (Maharashtra Prevention of Defacement of Property Act, 1995) लागू केला आहे. या कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी, इमारतींवर, भिंतींवर, कुंपणांवर, खांबांवर, झाडांवर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी विनापरवानगीने काहीही प्रदर्शित करणे किंवा चिटकवणे हा गुन्हा आहे. शहरांचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा, १९९५’ एक महत्त्वाचे पाऊल आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकांमध्ये जागरूकता वाढवून, आपण आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!