अभयसिंह जगताप यांची महाखनिज प्रणालीचा राज्यात प्रथम क्रमांक
“महाखनिज”या यशस्वी उपक्रमाचे शिल्पकार आहेत माण तालुक्यातील अभयसिंह खाशेराव जगताप, जे ‘शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रा. लि.’चे संचालक असून, त्यांनी ‘महाखनिज’ ही प्रणाली राज्य शासनासाठी विकसित केली. या प्रणालीमुळे खनिज उत्खनन, परवाने, वाहतूक व महसूल वसुली या सगळ्या प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन झाल्या आहेत. या डिजिटल परिवर्तनामुळे शासनाच्या महसुलात हजारो कोटींची वाढ झाली आहे, हे या प्रणालीचे सर्वात मोठे यश ठरते.
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी व गौण खनिजांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंगचा वापर करून एक क्रांतिकारी तंत्रज्ञानप्रयोग राबविण्यात आला. या अभिनव उपक्रमाने केवळ स्थानिक नव्हे तर राज्यभरातही सर्वांचे लक्ष वेधले. अवैध वाहतुकीवर त्वरित कार्यवाही करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘AI बेस्ड मॉनिटरिंग सिस्टीम’ने प्रशासनाचे कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक बनवले आहे.
या अद्वितीय प्रयोगाची राज्य शासनाने दखल घेतली असून, २०२३-२४ सालच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धेत विभागीय स्तरावर या प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळवून रु. १० लाखांचे पारितोषिक पटकावले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातील हा राज्यातील सर्वोत्तम नमुना ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या उपक्रमाचे शिल्पकार अभयसिंह जगताप हे
अमेरिका आणि युरोपातील मोठ्या प्रकल्पांसाठी आमंत्रणे असूनही अभयसिंह जगताप यांनी परदेशातील संधी नाकारून महाराष्ट्रासाठी काम करण्याचे व्रत घेतले. त्यांचे सॉफ्टवेअर आज कृषी, दुग्ध व्यवसाय, भारतीय रेल्वे, संरक्षण क्षेत्रातही यशस्वीपणे वापरले जात आहे.
एक सामान्य ग्रामीण भागातील तरुण असलेले अभयसिंह जगताप यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेला नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव केवळ त्यांच्या माण तालुक्यात नव्हे तर मंत्रालयातही होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानामुळे ते महाराष्ट्रातील नव्या पिढीच्या ‘टेक लीडर्स’पैकी एक म्हणून ओळखले जात आहेत.
अभयसिंह जगताप यांच्या प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान
आतापर्यंत राज्यामध्ये अवैद्य वाळू चोरी, गौण खनिजांची बेकायदेशीर वाहतूक रोकण्यामध्ये महसूल प्रशासनाला अनेकदा अपयश आले आहे. मात्र यांच्या महाखनिज प्रणाली या प्रकल्पामुळे याला आळा बसणार त्यामुळे प्रशासनावरील कामाचा ताण कमी होणार. हा राज्यातील पहिला कल्प झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सन्मान करण्यात आला.
