महत्त्वाच्या बातम्या

आजचे संस्कार भविष्यातील आदर्श पिढी निर्माण करतील – सपोनि अक्षय सोनवणे 

   बाल वयापासून मुलांवर योग्य संस्कार घडवले तरच भविष्यातील आदर्श पिढी निर्माण होईल असे मार्गदर्शन चिमूरड्यांच्या उपस्थित पालकांना दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी.

श्रेयस इंग्लिश मिडीयम स्कूल, राणंदच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी केले. यावेळी श्रेयस इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक दत्तात्रय जगदाळे,मुख्याध्यापिका सौ.रुपाली जगदाळे, पत्रकार प्रवीण राजे, पत्रकार उमेश बुधावले,प्रताप शिंदे, नंदा शिंदे, विध्यार्थी व सर्व पालक उपस्थित होते.

     सपोनि.अक्षय सोनवणे पुढे म्हणाले ज्याप्रमाणे काळ बदलत चालला आहे त्याप्रमाणे आपल्यालाही बदल करणे गरजेचे आहे.शहरी भागापासून लांब अंतरावर राहणाऱ्या मुलांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागते मात्र राणंद मधील श्रेयस इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे मोही, मार्डी, राणंद, खुटबाव, सोकासन सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम व दर्जेदार शिक्षणाची सोय झाली ही कौतुकाची बाब आहे.

             यावेळी बेस्ट स्टुडंट आणि बेस्ट फ्रेंड्स अवॉर्ड्स वितरण झाले या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच ज्योती निलेश सावंत यांना बेस्ट टीचर,पूजा नवनाथ शिंदे बेस्ट परफॉर्मन्स व प्राजक्ता जय सावंत बेस्ट कोरिओग्राफर पुरस्कार मिळाला.बालचमुंनी विविध गाण्यावर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमासाठी प्रताप शिंदे व नंदा शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर शेडगे यांनी केले.व नितीन देवकर यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!