महत्त्वाच्या बातम्या

आ. मनोज दादा घोरपडेंनी घेतली उरमोडी कालवा पाणीप्रश्नाबाबत दखल

       आज झालेल्या जनता दरबारात खटाव तालुक्यातील उरमोडी सिंचनासंबंधी आलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या व निवेदने याबाबत थेट उरमोडी खटाव कालव्यास भेट देत आमदार मा. श्री.मनोजदादा घोरपडे यांनी पाणीप्रश्नाबाबात दखल घेतली. यावेळी उरमोडी अधिकाऱ्यांकडून उरमोडी व तारळी प्रकल्पाची सविस्तर माहिती घेवून चर्चा केली. या कालव्यास यावर्षी प्रथमच सोडलेल्या आवर्तनातील पाणी पुजन करून तारळी कालव्यात पाणी सोडले.

      तसेच पुढील भागातील शेतकऱ्यांनी त्वरीत मागणी अर्ज दाखल करून पाणी घेणेसाठी आवाहन केले. यावेळी पुसेसावळी, म्हासुर्णे, लाडेगाव, शेनवडी भागातील लाभधारक शेतकरी व सिंचन अधिकारी श्री. विकास बनसोडे, (सहाय्यक अभियंता), शाखाधिकारी श्री डि जे जाधव, महेश घार्गे (संचालक मार्केट कमिटी वडूज), कृष्णत शेडगे (संचालक खटाव माण साखर कारखाना), श्री फरांदे तसेच अनिल कदम, पांडूरंग वाईकर व इतर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!