महत्त्वाच्या बातम्या

आ.सुरेश धसाचा गुंड कार्यकर्ता सतिश भोसले याला प्रयागराज येथून अटक

     आमदार सुरेश धस गेले तीन महिने धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत होते. तदनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनरेट्या पुढे नमते घेत नामदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदांना पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. या प्रकरणामुळे आमदार सुरेश धस यांची कॉलर टाईट झाली परंतु त्यांच्याच एका सतिश भोसले नामक कार्यकर्त्याच्या प्रकरणामुळे आमदार सुरेश धस यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे.
     आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले यांनी आपल्या वाहनांमध्ये नोटांचे बंडल फेकल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. तदनंतर सतीश भोसले एका इसमास प्रचंड मारहाण करत असल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासनास जाग आली तोपर्यंत सतीश भोसले यांनी पोबारा केला होता. आज अखेर पोलिसांनी सतीश भोसले यांच्या मुसक्या आवळल्या त्याला प्रयागराज येथून अटक केली आहे. गेल्या आठवड्यात आमदार सुरेश धस यांनी माझे असे असंख्य कार्यकर्ते आहेत ते पाठीमागे काय करतात हे मला माहिती नाही आणि माझा त्याच्याशी संबंध नाही असा खुलासा केला होता.
      एकंदरीत पहाता धुतल्या तांदळाचा आव आणणारे आ.सुरेश धस यांचे प्रकरण विरोधकांना आयते कोलीत मिळाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राची विकास संकल्पनेस त्यांच्या व त्यांच्या सहकारी पक्षातील आमदार काळे फासत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!