महत्त्वाच्या बातम्या

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा:  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअतंर्गत २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना, बीजभांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना अशा एकूण ६ योजना राबविण्यात येत आहेत. यापैकी वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्यंयसिध्दी व्याज परतावा योजना व पुर्णपणे ऑनलाईन स्वरुपाच्या आहे. या योजनांच्या लाभासाठी  महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावे.

     जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी बिंग, दुसरा माळा, जुनी एम.आय.डी.सी. रोड, बॉम्बे रेस्टॉरन्ट उड्डाण पुलाजवळ, सातारा   दुरध्वनी क्रमांक ०२१६२-२९५१८४ संपर्क साधावा असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!