इथेही लुटण्याचा कार्यक्रम नंबर प्लेटबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र
सांगली : 2019 पूर्वीच्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलून एचएसआर (हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन) नंबर प्लेट वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र, अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नंबर प्लेट बदलण्यासाठी तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे इथेही लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे का,’ असा खोचक सवाल माजी मंत्री जयंत पाटील यांनी – पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
हे पत्र आता सोशल मीडियावर’व्हायरल’ होत आहे.पत्रात म्हटले की, वाहनांची सुरक्षा आणि ओळख निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआर (हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन) नंबर प्लेट वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र, महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय, असा प्रश्न उद्भवला आहे.अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
महाराष्ट्रातील नंबर प्लेट बदलण्यासाठी शासनाने रॉसमेत्रा सेफ्टीसिस्टम लि. रीअर मेझॉन इंडिया लि.. एचएसआरपी एफटीए सोल्यूशन प्रा. लि. सहाशे कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे.जयंत पाटील तीन कंपन्यांना या कंपन्या अन्य राज्यांच्या तुलनेत तिप्पट पैसे आकारत आहेत. गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्येही याच कंपन्यांना काम मिळाले आहे. उदाहरणार्थ गुजरातमध्ये दुचाकीला १६० रुपये, तर राज्यात ४५० रुपये, चारचाकीला गोव्यात २०३ रुपये, तर राज्यात ७४५ रुपये लागत आहेत.
तीन खासगी कंपन्या कोणाच्या पुढाकाराने नागरिकांची लूट करीत आहेत. हे कंत्राट कुणी दिले, याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, ही कंत्राटे रद्द करून सामान्यांना परवडतील असे दर ठरवून नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, तसेच ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत, त्यांचे अतिरिक्त पैसे परत करावेत, असे पत्र जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
