महत्त्वाच्या बातम्या

उंच भरारी योजने अंतर्गत विविध प्रशिक्षणाचे आयोजन

    पोलीस अधीक्षक समीर शेख हे नवनवीन उपक्रम राबविण्यात नेहम च अग्रेसर असतात. पोलिसांना घर मिळवून देण्यासाठी गृहप्रदर्शन भरवणे, नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा लवकर होण्यासाठी संवाद, तक्रारदाराशी या कार्यक्रमाचे आयोजन, याचबरोबर गेल्या वर्षीपासून भरकटलेल्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊन समाज प्रवाहात  आणण्यासाठी उंच भरारी योजनेचा प्रारंभ त्यांनी केला.
      सातारा जिल्हा पोलीस दल व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन प्रशिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने या योजनेअंतर्गत रोजगार व सेवा रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो. या योजनेमार्फत वय वर्ष 18 ते 30 व किमान दहावी पास असणाऱ्या युवकांना प्रत्यक्ष 45 दिवस वेगवेगळ्या ट्रेड चे प्रशिक्षण दिले जाते हे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असते त्याचबरोबर राहण्याची व भोजनाची व्यवस्था मोफत केली जाते .दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी पात्र उमेदवारांना असिस्टंट इलेक्ट्रिशियन तसेच दुचाकी व चार चाकी सर्विस टेक्निशियनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण हे 45 दिवसाचे  असून इलेक्ट्रीशियन  प्रशिक्षण हे भोर येथे दिले जाणार असून दुचाकी व चार चाकी सर्विस टेक्निशियन प्रशिक्षण लोहगाव पुणे येथे दिले जाणार आहे. तसेच पात्र उमेदवारांना प्रशिक्षणानंतर रुपये 7500 ते रू 18000 हजार पर्यंत मानधन मिळू शकते प्रशिक्षणानंतर सदर विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!