उर्मिला कोठारेच्या कारला भीषण अपघात
मुंबईत काल रात्री भीषण अपघात झाल्याची घटना घडली. राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारने दोन जणांना उडवले. रात्री उशिरा शूटिंग संपवून घरी परतताना हा अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे.
भरधाव वेगात असणाऱ्या उर्मिला कोठारे यांच्या कारने मेट्रोचे काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती, कार चालक आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे हे गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने कार मधील एअर बॅग उघडल्याने उर्मिला कोठारे बचावली आहे. त्यानंतर कार चालकावर समता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चालक व उर्मिला यांना कांदिवलीच्या नमो रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
