एक गोष्ट सागरी जलतरण पट्टू घडवण्या साठीच्या स्वप्नपूर्तीची
साधारणतः वर्षापूर्वी नोव्हेंबर- डिसेंबर 2023 मध्ये मनपाचे साई ऍक्वारियम जलतरण तलाव येथे पोहणे कला शिकण्यासाठी आलेला दिव्यांग प्रकारातील अर्णव पंकज लोखंडे हा उत्तम प्रकारे पोहणे कला शिकत पुढे वर्षभर सातत्य ठेवत 21-22 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या वतीने मालवण येथे आयोजित केलेल्या एक किलोमीटरच्या 14 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेमध्ये 14:38:00 वेळ नोंदवत तिसऱ्या क्रमांकावर आयुष्यातील पहिली सागरी जलतरण स्पर्धा खेळून पदक पटकाविले.
यामागे त्याचे मनपाचे तलवावरील एक महिना व सिल्वर फिटनेस क्लब-चिखली येथील एक महिना व स्वतःचे अपार मेहनत सुरुवातीपासून निरीक्षणपूर्वक लक्ष देऊन बारीक बारकावे त्याच्या निदर्शनास आणून त्याच्याकडून कोच ने वर्कआउट करून घेतला.तसेच
अर्णवच्या या वाटचालीत त्याचा ग्राउंड फिटनेस, डाएट फिटनेस त्याच्या शेड्युलनुसार विविध तलावावरती त्याच्या पालकांनी व प्रशिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
