महत्त्वाच्या बातम्या

एक मत अमूल्य मत…

      लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क हा देशातील प्रत्येक नागरिकाला आहे. पण तरीसुद्धा मागील वर्षांमध्ये पाहता मतदानाचा टक्का तेवढा सुधारलेला दिसत नाही. लोक मतदानाची सुट्टी मजा म्हणून घालवतात. पण दिवसातल्या तुमच्या दहा-पंधरा मिनिटातील  मतदानामुळे  देशातील आपल्या विभागाचा विकास अवलंबून असतो.  हे चालू  राजकारण पाहता आता मतदान कोणाला करावे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आपल्या भारतात लोकशाही तर आहेच पण त्या लोकशाहीचा भोग घेण्यासाठी भारतीय जनता जणू मान्यच करत नाही. संविधानिक अधिकारानुसार प्रत्येकाला म्हणजे 18 वर्षे पूर्ण असणाऱ्याला मतदानाचा हक्क आहे.  प्रत्येकाला एकच मताचा अधिकार आहे मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा धर्माचा हक्क मात्र सारखाच.

आपल्या एका मताची किंमत अजून आपल्याला कळाली नाही. एका मतामुळे  उमेदवार  निवडणूक जिंकत  असतो आणि हरत ही असतो. हे आज प्रत्येक मतदाराला माहिती  असूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. ऐका मताचे मूल्य त्याला विचारा जे एका मताने निवडणूक हरले आहेत आणि जिंकले आहेत. आपण  सर्व जे मतदान प्रक्रियेमध्ये येतात  ज्यांना मतदानाचा हक्क आहे त्यांनी मतदान करायला हवं. आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर समाजाच्या कल्याणासाठी विचाराने मतदान करायला हवं.आज मतदान करणारा  विकासाकडे आणि  समाज कल्याण करणाऱ्या घटकांकडे  दुर्लक्ष करत आहे. पण आजचा मतदार वैयक्तिक पक्ष प्रेमावर मतदान करत आहे. हे समाजासाठी हानिकारक आहेच पण वैयक्तिक जीवनात ही त्याचा घातक प्रभाव पडतो. या मानवी परिवर्तनाच्या काळात सगळं कृत्य चालू आहे .सत्य बोलणाऱ्यांना आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य  दिसून येत नाही.  विकासाच्या नावावर धर्मवाद आणि जातिवाद पसरवला जातो.  विशिष्ट समाजाला उच्च दर्जा देण्यात येतो या  सगळ्याचे मूळ एकच आहे की मानव आज योग्य प्रकारे  उमेदवार निवडत नाही .राष्ट्रसंत तुकडोजी  महाराज त्यांनी  लिहलेल्या ग्रामगीतेत  म्हणतात…

||मत हे दुधारी तलवार

 उपयोग ना केला बरोबर
याचा आपणावरीच उलटतो वार शेवटी||
||ऐसा नको ची पुढारी
ज्यांनी नाही केली कर्तबगारी
तो मित्र नव्हे वैरी समजतो आम्ही||                           याचा अर्थ आपल्याला सहज लावता येतो. यात  एका मताची किंमत किती आहे हे कळून येतं. आता महत्त्वाचा प्रश्न मतदान कोणाला करावे ?  आपण सगळ्यांच्या बुद्धीला तेवढेच मान्य असते की जो नेता विकास करेल त्यालाच आपण मतदान करत असतो. हे बरोबरच आहे की मतदान विकास कामावर दिले पाहिजे पण या मध्ये खरोखरच विकास झाला आहे का नाही तपासून पाहणे हे मतदाराचे काम असते.आजचा उमेदवार आपल्याला समाजामध्ये परिवर्तन करताना दिसून येत नाही यामागचे कारण काय असेल ? या फुटीच्या आणि सत्तेच्या  राजकारणासाठी  महाराष्ट्राची परिस्थिती ही धोकादायक दिसून येते. याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर दिसून येतो मतदान कोणाला करावे जो उमेदवार समाज कल्याणसाठी, समाज परिवर्तनासाठी, जो वंचित दुर्बलांच्या  समस्यांसाठी न्याय देईल असा उमेदवार असावा.

     जो उमेदवार महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करेल. जो जनतेच्या हितासाठी निर्णय घेईल खोटे बोलून प्रचार करणारे खूप आहेत.जो उमेदवार सगळ्या जाती-धर्माचा विचार करेल म्हणजेच “सर्व धर्म समभाव” मानत असेल त्यालाच खरा सत्तेचा हक्क आहे.जो मानत असेल की मी  प्रथमता आणि अंततः भारती आहे. भ्रष्टाचार करणारी खूप मिळतील पण समाजकारण करणारे मिळणार नाहीत  याची नोंद सर्वच मतदारांनी घ्यायला हवी तेव्हाच समाजामध्ये परिवर्तन  होईल  मतदान करण्याचा संपूर्ण अधिकार हा मतदारांच्या हातात असतो. तुमचे एक मत हे सगळ्या  समाजाची परिस्थिती ठरवत असते.मतदारांनी त्यांचे मत त्यांच्या विवेक बुद्धीच्या वापराने करावे.  

         गणेश नंदकुमार वर्णेकर
   छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!