महत्त्वाच्या बातम्या

एसटी भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट, शिवसेना ठाकरे गटाचा आक्रमक विरोध्

     राज्यभरात एसटी भाडेवाढीवर विरोधाचा सूर उठला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या वाढीव भाड्यांचा विरोध केला असून, “एसटी महामंडळ फायदेशीर आहे, मग भाडेवाढ का?” असा सवाल उपस्थित केला आहे. या मुद्द्यावर ठाकरे गटाने राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाच्या समितीने 14.95% भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांवर मोठा परिणाम झाला आहे. पुणे आणि कोकणमधील प्रवासाचा तिकिट दर अचानक वाढल्याने प्रवाशांमध्ये असंतोष वाढला आहे. पुणे ते मुंबई किंवा बोरिवलीचा प्रवास आधी 540 रुपये होता, पण आता तो 624 रुपये झाला आहे. याचप्रमाणे, रत्नागिरी ते मुंबईचा तिकिट दर 550 रुपये असताना आता 634 रुपये होणार आहे.
ठाकरे गटाचे नेते या भाडेवाढीला त्वरित मागे घेण्याची मागणी करत आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जर भाडेवाढ मागे घेतली नाही तर हे आंदोलन सुरूच राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!