एसटी वाहकाची प्रवाशा सोबत धक्काबुक्की
एसटी प्रवासामध्ये चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये वादाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. अशीच एक घटना सातारा बसस्थानकात घडली आहे. रविवारी संध्याकाळी ८.३० च्या सुमारास कराड ठाणे बस क्र. MH09 EM9218 बस स्थानकावर थांबली होती. प्रवासी देशपांडे यांनी बस वाकडला थांबेल का विचारणा केली असता बसच्या वाहकाने वाद करण्यास सुरुवात केली. कराड ठाणे शिवशाही गाडीतून वाकड येथे प्रवास जाण्यास दांपत्यास नकार दिला सदर घटनेची तक्रार करण्यास सदर महिला गेली असता सदर महिलेच्या पतीस ड्रायवर कंडक्टर यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच महिला प्रवाशास सुद्धा धक्काबुकी केली. या घटनेने सातारा स्थानकात खळबळ माजली आहे. त्यामुळे तत्काळ शहर पोलीस ठाण्यातून जादा कुमक मागवली आहे. सदर दोषीवर गुन्हा दाखल करावा अशी जमावाकडून मागणी करण्यात आली आहे त्यामुळे पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी झाली असून सदर दोषीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे
