महत्त्वाच्या बातम्या

ऐज्यूस्मार्ट अबॅकस शाहूपुरी सेंटरच्या स्वराली इथापेचे यश 

    मोरघर ता. जावळी येथील कन्या व निर्मला कॉन्व्हेंट स्कुल सातारा येथील इयत्ता सहावीतील व एज्यूस्मार्ट अबॅकस शाहूपुरी सेंटरची विध्यार्थिनी कु स्वराली संदीप इथापे हिने सतराव्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत  100 पैकी 100 गुण मिळवून निर्भेळ यश संपादन केले आहे.
      या यशामुळे मलेशिया येथे होणाऱ्या मॅथेमॅटिक्स अँड मेटल  अर्थमॅटिक या अंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तीला शाहूपुरी अबॅकस सेंटरच्या चालका सौ रेखा रणजित पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल जयहिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, तसेच सचिव हनुमंत मांढरे, रविंद्र कदम, जावळी तालुका जयहिंद फाऊडेशनचे संचालक, मोरघर गावचे सुरेश गायकवाड, नीलेश गायकवाड, सचिन इथापे, भगवान गायकवाड आदि ग्रामस्थ महिलांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!