महत्त्वाच्या बातम्या

कराड नंतर पाटणचे शेतकरी फार्मर आयडी काढण्यात अव्वल जिल्ह्यातील तीन लाख 47 हजार अधिक शेतकऱ्यांची नोंदणी

        शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे. आयडीमुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. त्यासाठी ‘ॲग्रिस्टॅक नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार २३१ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यात कराड तालुक्याच्या तुलनेत पाटण तालुक्याने चांगले काम केले आहे. पाटण तालुक्यात एकूण ४४ हजार १७३ इतक्या शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

       ॲग्रिस्टॅक प्रकल्पात प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्याला युनिक फार्मर आयडी दिला जात आहे. शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी कॅम्पमध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या खाते उताऱ्याला जोडण्यात आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. ज्यांच्या नावे सात-बारा नोंद आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना  ॲग्रिस्टॅक अनिवार्य आहे.फार्मर आयडी काढण्यात पाटण तालुक्यात महसूल प्रशासनाचे चांगले काम : तहसीलदार अनंत गुरव
पाटण तालुक्यात अनेक दुर्गम अशी डोंगराळ भागात गावात वसलेली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी राहत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना पोहचविण्याच्या दृष्टीने प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करत आहेत. राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून पाटण तालुक्यात ४४ हजार १७३ शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे वाटप करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी ‘ लोकप्रांत  शी बोलताना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!