महत्त्वाच्या बातम्या

कर्जाचे व्याजदर कमी करा, शिक्षक बँकेच्या सभासदांची मागणी

दहिवडी : प्राथमिक शिक्षक बँकेने नुकताच शताब्दी महोत्सव साजरा केला.या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.त्यासाठी मोठा खर्चही करण्यात आला.पण सभासदांच्या पदरी काहीही पडले नाही.वास्तविक पाहता दीर्घमुदत कर्जाचे व्याजदर एक अंकी होण्याची सभासद वाट पाहत आहेत. 

      अशातच संस्थेचे कर्जवाटप बरेचसे कमी झाले आहे.त्यामुळे संस्थेच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.तरी दीर्घमुदत कर्जाचे व्याजदर एक टक्क्याने कमी करण्यात यावा किंवा दीर्घमुदत दोन हा नवीन कर्जप्रक्रार सुरू करून त्याचा व्याजदर १०% ठेवावा व कर्जमर्यादा २५ लाख करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.

     तसेच डी.सी.पी.एस.धारक मयत सभासदांचे कर्ज संपूर्ण माफ करावे अशा आशयाचे निवेदन शिक्षक बँकेच्या चेअरमन निशा मुळीक,व्हा.चेअरमन सुरेश पवार,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कणसे यांना देण्यात आले.निवेदनावर माजी व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे,संचालक विजय शिर्के,माजी संचालक बंडोबा शिंदे,खंडाळा तालुकाध्यक्ष नवनाथ क्षीरसागर,कोरेगाव अध्यक्ष अरुण घोरपडे,बळीराम वीरकर,संजय खरात,राजेंद्र खरात यांच्या स्वाक्षऱ्या असून वरील मागण्या तत्काळ मान्य कराव्यात असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!