महत्त्वाच्या बातम्या

कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या, जेलमध्ये घेतला गळफास

कल्याण: कल्याण पूर्व भागात 23 डिसेंबरला एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करुन तिचा मृतदेह बापगाव परिसरात फेकण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली होती. सध्या तो तळोजा कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगत होता. आता आरोपी विशाल गवळीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्याने तळोजा कारागृहात गळफास घेत पहाटे आत्महत्या केली.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल गवळी हा तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज पहाटे त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.  विशाल हा पहाटे शौचालयासाठी गेला. तसेच त्याने पहाटे साडेतीन  वाजता गळफास लावून आत्महत्या केली.  त्या ठिकाणी विशाललने टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे .जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
         कल्याण पूर्वेमधील कोळसेवाडीत राहणाऱ्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह भिवंडी-कल्याण सीमेवरील गांधारी पुलाजवळील स्मशान संकुलात आढळला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.  यानंतर कल्याण पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. या घटनेचा मुख्य आरोपी असलेल्या विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली. त्यापूर्वी त्याची पत्नी साक्षीला अटक करण्यात आली होती.
        साक्षीने पोलिसात दिलेल्या जबाबानुसार ती खासगी बँकेतून कामावरुन घरी आली. संध्याकाळी सात वाजता ती घरी आल्यानंतर तिला घडलेला सर्व प्रकार विशालने सांगितला. यानंतर सात वाजता आम्ही दोघेही पती-पत्नी यांनी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे, याबद्दल योजना आखली. त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले. रात्री साडेआठ वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. यानंतर नऊ वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले आणि मृतदेह फेकून दोघे परतले, असे साक्षीने यावेळी सांगितले. यानंतर साक्षीच्या जबाबानंतर पोलिसांनी विशालचा शोध घेण्यास सुरुवात केली.
        यानंतर कल्याण क्राईम ब्राँचला विशाल शेगाव या ठिकाण असलेल्या लॉजवर थांबल्याची माहिती मिळाली होती, याच माहितीच्या आधारे पोलीस तिथे पोहोचले. पण विशाल तिकडे नव्हता. त्यानंतर जवळच्या एका सूलनमध्ये दाढी करायला गेलेल्या विशालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशाल हा लूक बदलून पोलिसांना गुंगारा देण्याच्या तयारीत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!