महत्त्वाच्या बातम्या

कळंबेच्या प्रतिक भोसलेची फ्लाईंग ऑफिसर पदी निवड

सातारा : कळंबे ता. सातारा येथील गावचे सुपुत्र प्रतिक प्रदीप भोसले याची एअर फोर्समधील फ्लाईंग ऑफिसर पदी नुकतीच नियुक्ती झाली. सन 2025 AFCAT मध्ये एअर फोर्स टेक्निकल कॉलेज, बंगलोर येथे तो पास आऊट झाला असून सध्या त्याची नियुक्ती गुजरात येथील वडोदरा येथे झालीआहे. 

    प्रतिक हा कळंबे गावचे माजी सैनिक कै.नारायण भोसले यांचा नातू व माजी उपसरपंच संतोष भोसले यांचा पुतण्या होय.प्रतीकला कुटुंबीयांची सैनिकी परंपरा लाभली असून माझा नातू हा सैन्यदलात ऑफिसरच झाला पाहिजे हे त्याच्या आजोबांचे स्वप्न होते. प्रतिकने परिश्रम, जिद्द, मेहनत व कुशाग्र बुद्धीच्या जोरावर सैन्यदलात ऑफिसर होण्याचे स्वप्न साकार केले. त्याच्या या यशात वडील प्रदीप व आई सुनिता भोसले मार्गदर्शन व पाठबळ लाभले.

     प्रतिक भोसले यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले. सन 2018 मध्ये एनडीच्या परीक्षेत तो पहिल्यांदा उत्तीर्ण झाला. नंतर पुणे येथे कॉम्प्युटर सायन्समधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर तो UPSC ची CDS परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचे इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) मध्ये सिलेक्शन होऊन ऑल इंडिया रँक मध्ये 13व्या क्रमांक पटकाविला. त्यानंतर जून 2023 ला AFCAT मध्ये त्याचे सिलेक्शन झाले.

  एअरफोर्स टेक्निकल कॉलेज, बंगलोर येथे तो पास आऊट झाला. सध्या त्याची नियुक्ती गुजरात येथे फ्लाईंग ऑफिसर पदी नियुक्ती झाली. त्याला लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर, ऋषिकेश आपटे, समीर बोरस्कर, कमांडर सचिन जोग, ग्रुप कॅप्टन रमेश जाधव, अनिस कुट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल ना. शिवेंद्रराजे भोसले, माजी सभापती सौ.सरिता इंदलकर, कळंबेचे उपसरपंच अँड. विजय इंदलकर, शिक्षिका मंगल शेलार, रेणुका भोसले, रजनी वानखेडे, तुकाराम शेलार, अनिल जायकर, सचिन सुळके यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!