महत्त्वाच्या बातम्या

कामे निवडणण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना द्या : दादासाहेब काळे

 

  वित्त आयोगाच्या उपयोजन व विकास संदर्भात मार्गदर्शक सूचना मागवण्याच्या समितीमध्ये माण तालुक्यातील आंधळी गावाचे कृतीशील व आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे १६ व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत विकासासाठी महत्वपूर्ण विषयावर ही बैठक पार पडली. यावेळी प्रधान सचिव एकनाथ डवले, १६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगडिया यांना विविध मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. १६ व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने पूर्वतयारी संदर्भात ही बैठक घेण्यात आली होती.

 

       या बैठकीस वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी आदर्श सरपंच पोपटराव पवार, आर्दश सरपंच दादासाहेब काळे, अमोल भुजबळ, संतोष पाटील येरगीकर, मनिष फुके, अर्चना सावंत, जयश्री इंगोले, सिंधु तायडे, तेजराम चव्हाण, प्रल्हाद श्रद्धा जायधने, डॉ कविता वारे, सुधीर गोसमारे, वाघमारे, भाऊसाहेब ढिकले, रणशिंग पाटील, तानाजी लांडगे, महेश आगे, सुनील ठाकरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत समितीमधील सदस्यांनी ग्रामपंचायत बळकट करण्यासाठी आणि त्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्राचा विकास साधण्यासाठी विविध उपाययोजनांसंबंधी चर्चा केली. आराखडे तयार करताना निधीचे बंधित व अबंधित असे वर्गीकरण करू नये. ग्रामपंचायत/ग्रामसभा यांना स्थानिक गरजेनुसार व निकषांनुसार कामे निवडण्याचा किंवा त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार असावा. वाढलेल्या लोकसंख्येच्या निकषानुसार निधीचे वाटप व्हावे. बदलत्या गरजेनुसार ग्रामपंचायतीला कामे निवडण्याचे स्वातंत्य असावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!